
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादा यांची लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर या महाविद्यालयास सदिच्छा भेट
आज दिनांक ३० ऑक्टोंबर २०२५ रोजी बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर येथे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.रविराज देसाई (दादा) यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान दादांनी महाविद्यालय परिसराची पाहणी करून महाविद्यालयांचे प्राचार्य ,प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत दादांनी मौलिक सूचना दिल्या.व मार्गदर्शन केले.