
दौलतनगर (ता. पाटण)
लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर (मरळी) येथील प्रथम वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे शैक्षणिक अभ्यासदौरा केला. या अभ्यासदौर्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणातील विविध विभागांची प्रत्यक्ष माहिती व अनुभव मिळावा हा होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, कीटकशास्त्र, उद्यानविद्या, रोगशास्त्र, कृषीशास्त्र, विस्तारशास्त्र व कृषी अर्थशास्त्र या विभागांना भेट देऊन प्रात्यक्षिक अनुभव घेतला.
पशुसंवर्धन विभागाचे प्राध्यापक डॉ. डी. डी. पतंगे यांनी विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, पशुपालनातील रोजगाराच्या संधी तसेच चालू असलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.
कीटकशास्त्र विभागात प्राध्यापक डॉ. ए. एस. बागडे यांनी विद्यार्थ्यांना विविध कीटक प्रात्यक्षिके दाखवून बायोपेस्टिसाईड निर्मिती प्रक्रिया व त्यातील व्यावसायिक संधींचे सविस्तर मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक दौऱ्यात महाविद्यालयाचे प्राध्यापक जी. ए. शेख, एस. एस. राऊत, एस. के. लांडगे, व सी. एस. घुगे हे मार्गदर्शक म्हणून सहभागी होते.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभाग तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीमा. नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब ,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा , लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर या कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई दादा , युवानेते मा. ॲड.जयराज देसाई दादा व मा. चि.आदित्यराज देसाई दादा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यांनी अशा शैक्षणिक अभ्यासदौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते व त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक जी. ए. शेख यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या प्राध्यापकांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले