राष्ट्रीय सेवा योजना (NSS) रक्तदान शिबिर    Date : 20/Nov/2025

Featured Image

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनीकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त दौलतनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

       लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर येथील या कृषी महाविद्यालयांचे सर्व सेवक वृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक मा. नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

      या रक्तदान शिबिराला मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगरचे चेअरमन मा. श्री यशराज देसाई दादा, युवा नेते मा. ॲड. जयराज देसाई दादा, तसेच  मा. चि. आदित्यराज देसाई दादा यांची प्रमुख उपस्थिती होती.

      रक्त दान सर्वश्रेष्ठ दान...या उक्तीप्रमाणे रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी व सेवक वर्गाने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. कार्यक्रमातील सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांना अधिकाधिक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या शिबिरावेळी पाटण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.