उद्योजकतेतून कृषी क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आव्हान : एकदिवसीय कार्यशाळा    Date : 20/Nov/2025

Featured Image

लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्यांचे पर्यटन खणीकर्म,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या ५९व्या वाढदिवसानिमित्त कार्यशाळेचे आयोजन 

                               उद्योजकतेतून कृषी क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आव्हान : एकदिवसीय कार्यशाळा संपन्न 

दौलतनगर दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ – लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकतेतून कृषी क्रांती : नवसंकल्पना व वाढीच्या शक्यता’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळीचे अध्यक्ष मा. रविराज देसाई दादा यांनी भूषविले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. रविराज देसाई दादा यांनी विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणातून उद्योग निर्माण करण्याची दिशा स्वीकारावी, केवळ नोकरीवर भर न देता नवउद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.

कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या प्रकल्प प्रमुख प्रा. सोनल मंगल यांनी विद्यार्थ्यांना कृषी उद्योजकतेतील ताज्या संधी व उपक्रमांचे मार्गदर्शन केले. इ-कोलाय संस्था, कोल्हापूरचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कृषीतील नवसंकल्पना व डिजिटल शेतीची माहिती दिली. तसेच प्रा. नम्रता शिंदे यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांनी केले. कार्यशाळेसाठी लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र, मरळी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.