महाराष्ट्र राज्य ॲग्रिकल्चर पी.एच.डी. (Agriculture Ph.D.) २०२५ पात्रता परीक्षेत घवघवीत यश   Date : 21/Nov/2025

Featured Image

हार्दिक अभिनंदन 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना संचलित, लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर (मरळी) येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापिका नेवसे श्रद्धा विजय यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ॲग्रिकल्चर पी.एच.डी. (Agriculture Ph.D.) २०२५ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

प्राध्यापिका श्रद्धा नेवसे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कृषी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे.                           

मान्यवरांकडून कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा 

       प्रा. श्रद्धा नेवसे यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

        याशिवाय, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा यांनी  शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर या कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई दादा, युवा नेते मा. ॲड. जयराज देसाई दादा आणि मा. चिरंजीव आदित्यराज दादा यांनीही प्रा. नेवसे श्रद्धा विजय यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

        याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिंदे एस. एम., सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.