लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी   Date : 27/Mar/2026

Featured Image

 

       दिनांक : 19.02.2026 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व ज्योत पूजन करून करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन ऐतिहासिक पात्रे साकारून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राणी सईबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पुतळाबाई तसेच मावळ्यांची पात्रे साकारण्यात आली होती.

महाविद्यालयातील विद्यार्थी शैलेश जगताप, ओम साळुंखे आणि दुर्गा जाधव यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श समोर ठेवत त्यांच्या गुणांचे आत्मसात करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच निखिल गायकवाड आणि अनिकेत गोडसे यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे एस. एम. सर यांनी आपल्या मोलाच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.

तसेच हा कार्यक्रम मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. घुगे सी. एस. यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा व कशिश यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शेख जी. ए. यांनी मांडले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.