लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाच्या प्रा. तेजश्री जयवंत जाधव यांची कृषी अधिकारी पदी निवड - मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या हस्ते सत्कार संपन्न   Date : 16/Apr/2026

Featured Image

 

दिनांक: १७ फेबुवारी २०२६ - महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करत कृषी अधिकारी (Agriculture Officer) पदी निवड झाल्याबद्दल, लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयातील प्रा. तेजश्री जयवंत जाधव यांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या शुभहस्ते प्रा. तेजश्री जाधव यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

   आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिकेने राज्य पातळीवर मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या आनंददायी प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी प्रा. जाधव यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

तसेच, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर या कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई (दादा), युवा नेते मा. ॲड. जयराज देसाई (दादा) आणि मा. चिरंजीव आदित्यराज (दादा) यांनीही प्रा. तेजश्री जाधव यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

या गौरवास्पद कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे, सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही प्रा. जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्रा. तेजश्री जाधव यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.