कृषी महाविद्यालयात पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.   Date : 16/Apr/2026

Featured Image

 

          दिनांक :  १० मार्च २०२६ : महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष आणि थोर नेते स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११६ वी जयंती दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली.

         या जयंती महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे सर यांच्या शुभहस्ते स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या दिमाखदार सोहळ्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.