
पाटण - दिनांक : 04.05.2026 कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर संचलित, लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर येथे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्य वृद्धीसाठी ‘फ्लोरल डिझाइन आणि टेरारियम मेकिंग’ या विषयावरील विशेष एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगरचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई (दादा), युवा नेते मा. ॲड. जयराज देसाई (दादा) तसेच मा. चि. आदित्यराज देसाई (दादा) यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे सर आणि प्रमुख मार्गदर्शिका प्रा. सौ. संगीता सावर्डेकर यांचा प्रा. टी. जे. जाधव यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी मार्गदर्शिका प्रा. सौ. संगीता सावर्डेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फ्लोरल डिझाइन आणि टेरारियम या कलेचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या काळात या क्षेत्रात केवळ छंद नव्हे तर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी अशा कौशल्यांचा स्वीकार केल्यास ते भविष्यात यशस्वी उद्योजक बनू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी फुलांची आकर्षक मांडणी करण्याच्या विविध पद्धती तसेच काचेच्या पात्रात लहान रोपांची लागवड करून ‘टेरारियम’ तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.शिंदे सर हे होते,यावेळी ते म्हणाले की,या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळून स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. गुलजार शेख यांनी केले तर आभार प्रा. टी. जे. जाधव यांनी मानले.