
दिनांक : 20 मे २०२६ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर (मरळी) येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या सुविद्य धर्मपत्नी स्व. कै. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. आपल्या संस्कार, त्याग, आदर्श आणि कार्याची स्मृती सदैव आमच्या हृदयात राहील. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे एस. एम. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.