स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व वृक्षारोपण संपन्न....   Date : 21/Jul/2026

Featured Image

 लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या ४० व्या पुण्यतिथी निमित्त आज, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी, लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे एस. एम. सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि आबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. आबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! ????