लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर या महाविद्यालयाची निकालाची उज्ज्वल परंपरा कायम    Date : 24/Jul/2026

प्रथम वर्षाचा निकाल ९०% तर द्वितीय वर्षाचा ९४% निकाल 

दौलतनगर :  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना संचलित, लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर या  महाविद्यालयाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये  महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेची आपली  उल्लेखनीय निकालांची परंपरा कायम राखत उज्ज्वल  यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा निकाल तब्बल ९० टक्के, तर द्वितीय वर्षाचा निकाल ९४ टक्के लागला असून प्रथम वर्ष (1st Year) प्रथम क्रमांक: ऋतुजा प्रकाश साळुंखे (रा. उधवणे, ता. पाटण, जि. सातारा), द्वितीय वर्ष (2nd Year) प्रथम क्रमांक: अदिती अनिल वलेकर (रा. पारे, ता. खानापूर/विटा, जि. सांगली) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे  महाराष्ट्र राज्यांचे पर्यटन खनीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. यशराज देसाई दादा, युवा नेते ॲड जयराज देसाई दादा, मा. चि.आदित्यराज देसाई दादा, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयांचे प्राचार्य मा.डॉ.श्री.एस.एम.शिंदे सर सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,सर्व विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यशाबद्दल शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यास शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून कृषी शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपला वेगळा ठसा उमटवला आहे.