
१७ ऑक्टोबर २०२६ | दौलतनगर, ता. पाटण - लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुल व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, पाटण तालुक्याचे लाडके दादा मा. श्री. रविराज देसाई दादा व युवा नेते मा. श्री. आदित्यराज देसाई दादा यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर येथे भेट देऊन महाविद्यालयातील युवा विद्यार्थिनी कु. संचिती भगवान जाधव (बी.एस्सी. ॲग्रीकल्चर (ऑनर्स), प्रथम वर्ष) हिचा विशेष गौरव व सन्मान केला.
कु. संचिती हिने स्केटिंग रेकॉर्ड स्पर्धेत सलग ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याची उल्लेखनीय कामगिरी करत Universal, Global आणि Elite Legends World Records मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. तिच्या या असाधारण कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या तसेच पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी रविराज देसाई दादा व आदित्यराज देसाई दादा यांनी संचितीशी संवाद साधत तिच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक केले आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे, हीच युवा पिढीला प्रोत्साहन देण्याची आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची प्रेरणादायी परंपरा आहे.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कु. संचितीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!