
22 ऑक्टो 2026 मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ व लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादां यांच्या शुभ हस्ते सत्कार; लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर या कृषी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर संचलित,लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर, या कृषी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून श्री.अथर्व बागाडे यांची संशोधन सारांशाची तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ISCAR परिसंवादासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा आज मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादा यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
श्री.अथर्व बागाडे यांनी आपल्या संशोधनामध्ये “Climate-Smart Agriculture for Resilient Farming Systems: Adaptation and Mitigation Strategies in Semi-Arid Maharashtra, India” हा विषय असून
ISCAR या कृषी संशोधन क्षेत्राशी संबंधित संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी संशोधन सारांशाची निवड होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे कृषी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे पर्यटन , खनीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रविराज देसाई दादा यांनी सर्व शाखांचे मुख्याध्यापक ,प्राचार्य, प्राध्यापक ,शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग , आजी माजी विद्यार्थी, यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.